बंदीपुरात दहशतवादी हस्तक ठार   

दोन पोलिस कर्मचारी जखमी 

 
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या बंदीपुरा जिल्ह्यात शुक्रवारी उडालेल्या चकमकीत दहशतवाद्यांचा हस्तक ठार झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील कुलनार बझिपोरा येथे दहशतवादी लपल्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराने मोहीम राबविली आहे. ते लपलेल्या ठिकाणाजवळ ते पोहोचताच चकमक उडाली. त्यात दहशतवाद्यांचा एक हस्तक ठार झाला असून दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. गोळीबारात हस्तक गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याचा मृत्यू झाला आहे. 

Related Articles